Raj Thackeray | महाराष्ट्राच्या राजकारणाची विचित्र घाणेरडी परिस्थिती झालीयं – राज ठाकरे

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडताना दिसत असतात. तर अनेकदा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात.

अशात आता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची विचित्र घाणेरडी परिस्थिती झाली असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्या विचित्र घाणेरडी परिस्थिती झाली आहे. असं राजकारण अशी परिस्थिती मी महाराष्ट्रात कधीच बघितली नव्हती.

जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल, की जिथे एकच पक्ष आहे. खरंतर दोन पक्ष आहे. यातील अर्धा पक्ष सत्तेत आहे आणि अर्धा पक्ष बाहेर आहे. हे दोन्ही पक्ष एकाच नावाने आहे.

सत्तेत कोण आहे? तर शिवसेना. विरोधात कोण आहे? तर तिकडे देखील शिवसेना. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील हीच अवस्था झाली आहे. जगात तुम्ही कधी अशी परिस्थिती बघितली आहे का? याला राज्य म्हणायचं की काय म्हणायचं? महाराष्ट्रात फक्त दिवस ढकलले जात आहे.”

No one cares about the people – Raj Thackeray

पुढे बोलताना ते (Raj Thackeray) म्हणाले, “काल कोकणामध्ये तो पुल कोसळला? सगळ्या उड्डाणपूलांचे सर्वे झाले पाहिजे, हे मी आधीच सांगितलं होतं.

मात्र, कुणाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. जगा-मरा याच्याशी कुणाला काही घेणं-देणं नाही. फक्त मतदानाच्या दिवशी जगा. मतदान करून मेला तरी चालेल, अशी सध्या अवस्था झाली आहे. कुणाला जनतेची चिंता नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.