Manoj Jarange | आमचा भुजबळांना नाही तर त्यांच्या विचारांना विरोध – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत.

या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 40 दिवसांचा कालावधी दिला होता. 24 ऑक्टोबर 2023 रोजी हे 40 दिवस पूर्ण होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे प्रतिक्रिया दिली आहे. राज्य शासनाने गोरगरिबांच्या तोंडातील घास हिरावू नये, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “मी सामान्य माणसाचा मुलगा आहे. मी कधी कुणावर टीका करत नाही. गोरगरीब मुलांच्या तोंडातील घास हिरावू नका. त्या पापाचे वाटेदार होऊ नका.

देशात आणि राज्यात अशी एक पण शक्ती नाही, जी आमचं आंदोलन थांबवू शकेल. आम्ही आमचं आरक्षण मिळवूनच राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला शब्द दिला आहे, आणि त्यांच्या या वक्तव्याला संपूर्ण मीडिया साक्षीदार आहे.

त्यांना जर आम्हाला आरक्षण द्यायचं नाही तर त्यांनी समिती का स्थापन केली? मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, म्हणून समिती स्थापन झाली आहे.

आम्ही राज्य सरकारला चार दिवसांचा कालावधी दिला होता. परंतु, नंतर आम्ही त्यांना 40 दिवसांचा वेळ दिला. आम्ही कुणबी मराठा आहोत, आम्हाला प्रमाणपत्र द्या एवढंच आमचं म्हणणं आहे.”

We have no opposition to Chhagan Bhujbal – Manoj Jarange

पुढे बोलताना ते (Manoj Jarange) म्हणाले, “छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांना आमचा विरोध नाही. त्यांच्या विचारांना आमचा विरोध आहे.

आमच्या मराठा बांधवांनी त्यांना मोठं केलं आहे. त्या गोरगरिबांसाठी काही करून उपकार फेडण्याची वेळ आली तर ते आता मागे फिरत आहे. त्या विचारांना आमचा विरोध आहे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe