Sanjay Raut | चोरांना संरक्षण देणं म्हणजे सार्वभौमत्व नाही; संजय राऊतांची विधानसभा अध्यक्षांवर टीका

Sanjay Raut | मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असल्याचं ठाकरे गटानं म्हटलं आहे.

याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना चांगलं सुनावलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.

अशात आता या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर खोचक टीका केली आहे. चोरांना संरक्षण देणं म्हणजे सार्वभौमत्व नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Rahul Narwekar does not follow the rules of the book – Sanjay Raut

आज (18 ऑक्टोबर) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाही. ते त्यांच्या हाताखाली काम करतात.

सार्वभौमत्व म्हणजे काय? चोरांना संरक्षण देणं म्हणजे सार्वभौमत्व नाही? त्याचबरोबर चोरांच्या सरदारांना संरक्षण देणे म्हणजे विधिमंडळाचं सार्वभौमत्व नाही.

घटनेची मोडतोड करून मनमानी पद्धतीने निर्णय घ्यायचा, एवढा अधिकार त्यांना नाही. राहुल नार्वेकर पुस्तकातील कायदे मानत नाही. त्यांनी स्वतःचे कायदे तयार आहे.”

दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा चांगला समाचार घेतला आहे.

संविधानातील 10 व्या शेडयूलनुसार शिवसेनेतून फुटलेले 40 आमदार अपात्र ठरत आहेत व तशा स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने देऊनही अॅड. नार्वेकर संविधानास मानत नाहीत.

बेइमानांचे सरकार वाचवणे हे संविधानाचे संरक्षण नसून देशाशी विश्वासघात आहे. नार्वेकर लवादास कायदा कळत नसून ते जिहादी पद्धतीने वागत आहेत.

देश चालविण्याबाबत मोदी-शहांनी त्यांचा स्वतंत्र पर्सनल लॉ’ बनवला असून नार्वेकरांचा लवाद त्याच पर्सनल लॉ’चा पुरस्कार करीत आहे. आमदार अपात्रतेबाबत वेळकाढू धोरण स्वीकारून नार्वेकर हे स्वतला काय सिद्ध करू इच्छितात?, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.