Share

Rahul Narwekar | सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिली शेवटची संधी; 30 ऑक्टोबर पर्यंत द्यावं लागेल वेळापत्रक

Rahul Narwekar | टीम महाराष्ट्र देशा: आज सुप्रीम कोर्टामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिरंगाईच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली.

या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेल्या वेळापत्रकबाबत आम्ही असमाधानी असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

त्यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक देण्याची संधी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांसाठी ही शेवटची संधी असू शकते, अशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

The schedule submitted by Rahul Narwekar is not acceptable to the Supreme Court

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सादर केलेलं वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना नवं वेळापत्रक सादर करण्यासाठी पुन्हा एक संधी दिली आहे.

राहुल नार्वेकरांना 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांना 30 तारखेला नवं वेळापत्रक सादर करावं लागणार आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने आज देखील नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबाबत आम्ही समाधानी नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल देसाई, अनिल परब आदी नेते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

Rahul Narwekar | टीम महाराष्ट्र देशा: आज सुप्रीम कोर्टामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिरंगाईच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics