Manoj Jarange | सरकार मराठ्यांना आरक्षण देईल, टाळाटाळ करणार नाही – मनोज जरांगे

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू केलं होतं.

राज्य सरकारच्या मागणीनंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता.

14 ऑक्टोबर 2023 रोजी यामधील 30 दिवस पूर्ण झाले. या दिवशी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी या गावात जाहीर सभा घेतली. 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर सरकार मराठ्यांना आरक्षण देईल, असा ठाम विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

The state government has to keep its word – Manoj Jarange 

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “आम्ही सरकारला मुदत दिलेली नाही. सरकारने आम्हाला वेळ मागितला म्हणून आम्ही त्यांना 40 दिवसांचा वेळ दिला. 40 दिवसानंतर सरकार टाळाटाळ करणार नाही.

सरकारने जर टाळाटाळ केली तर मग अवघड होईल. राज्य शासनाला दिलेला शब्द पाळावाच लागणार आहे. जर त्यांना टाळाटाळ करायची होती तर त्यांनी आमच्याकडून वेळ मागितलाच कशाला? समिती स्थापन केलीच कशाला? 40 दिवसानंतर सरकारला आम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे.”

दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी फक्त उपोषणच नाही तर राज्याभर सभा देखील घेत आहे. 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांनी जाहीर सभा घेतली.

या सभेला लाखो संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. तर जरांगे यांची दुसरी सभा पुणे जिल्ह्यात होणार आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे 20 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांची विराट सभा पार पडणार आहे. मराठा क्रांती मोर्चाने या सभेचं आयोजन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.