Share

Nitesh Rane | संजय राऊत जेवढं बोलणार, तेवढं उद्धव ठाकरे खड्ड्यात जाणार – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना अपात्र आमदारांच्या मुद्द्यावरून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. विधानसभा अध्यक्ष चोरांचे सरदार म्हणून काम करत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टिकेला भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत जेवढं बोलणार तेवढं … Read more

Published On: 

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना अपात्र आमदारांच्या मुद्द्यावरून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

विधानसभा अध्यक्ष चोरांचे सरदार म्हणून काम करत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टिकेला भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत जेवढं बोलणार तेवढं उद्धव ठाकरे खड्ड्यात जाणार, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “संजय राजाराम राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. संजय राजाराम राऊत उद्धव ठाकरेंची अजून किती वाट लावणार आहे? याला आता काही मर्यादा नाही.

संजय राऊत यांचं तोंड जेवढं उघडत राहणार तेवढं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खड्ड्यात जाणार, हे आता अधोरेखित झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंडखोरी केली होती, तेव्हा संजय राऊत यांच्या भाषणामुळे कोर्टाने काही निर्देश दिले होते.

त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊत विधानसभा अध्यक्षांवर टीका करत आहे. अशा प्रकारचा दबाव विधानसभा अध्यक्षांवर असेल तर याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला हवी.”

Rahul Narwekar is making Timepass web series – Sanjay Raut

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. ते म्हणाले, “शिवसेनेचा निर्णय लवकरात लवकर घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना सतत देत आहे.

एवढं सगळं होऊन देखील विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय घेत नाही. ते सध्या टाईमपास वेब सिरीज बनवत आहे. विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदेंना संरक्षण देण्याचे काम करत आहे.

ते सध्या चोरांचे सरदार झालेले आहे. चोरांना संरक्षण देणं हा त्यांचा अधिकार आहे का? कारण सध्या ते कायदा आणि संविधान मानायला तयार नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही