Uddhav Thackeray | मिंधेंचा ‘माजवाद’ जनता कायमचा गाडेल; ठाकरे गटाची टीका

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटानं समाजवादाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलं धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांचा समाचार घेतला आहे.

समाजवादी हे धर्मनिरपेक्ष, तरीही वाजपेयींच्या सरकारात ते सामील झाले. समाजवादी सरकारात आल्याने भाजपचे ‘हिंदुत्व’ मिलावटीराम झाले नव्हते काय? मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढच्या काळात विधिमंडळ ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे.

इतिहासाची पाने चाळली तर त्यांच्या अगाध ज्ञानाची त्यांनाच लाज वाटेल. ‘उचलली जीभ लावली टाळय़ाला’ हा त्यांचा प्रकार राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहे.

मिंध्यांनी पक्षांचर केले व ढोंगांतरही केले. त्यातून निर्माण झालेला ‘माजवाद’ जनता कायमचा गाडेल, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

मुख्यमंत्री शिंदे हे काही दिवसांचेच पाहुणे आहेत असा सर्वोच्च न्यायालयाचाच निवाडा आहे. त्यांचे मुख्यमंत्रीपद जसे बेकायदा आहे तसे त्यांचे हिंदुत्वदेखील ढोंगी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ढोंगांतर’ करून जे हिंदुत्व स्वीकारले ते बेगडी आहे.

शिंद आता म्हणतात, उद्धव ठाकरेंना हिंदुत्ववादी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री आणखी बरेच काही बरळले. ते त्यांचे राजकीय वैफल्य आहे.

ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते त्याप्रमाणे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न होतोय, असा दिव्य संदेश शिद यांच्या मिध्या डोक्याने दिला. हिंदुत्वाचे ‘मिलावटराम’ असा उल्लेख त्यांनी केला.. यानिमित्ताने त्यांना राम आठवला हे बरे झाले.

अन्नात भेसळ करणाऱ्यांना जर हे महाशय मिलावटराम म्हणत असतील तर ज्यांनी तुमच्या ताटात आतापर्यंत सुग्रास जेवण वाढले ते जेवण ओरपून बेइमानी करणाऱ्यांना ‘नमकहराम’ म्हटले पाहिजे.

आता या नमकहरामांचे हिंदुत्व किती पुचाट आहे ते पहा. अहमदाबादेत ‘वर्ल्ड कप’ क्रिकेटचे सामने सुरू आहेत. तेथे पाकिस्तानचा संघ उतरला तेव्हा अहमदाबाद विमानतळापासून ते नरेंद मोदी स्टेडियमपर्यंत पाकडयांच्या स्वागतासाठी भाजपने म्हणजे ‘मोदी-शहा’ सरकारने लाल गालिचे अंथरले व पाकडया खेळाडूंवर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.

हेच काय तुमचे ‘मिंधे’छाप हिंदुत्व? यावर मिंधे म्हणतात, “खेळ व धर्माची गल्लत करू नका.” वा! हे कोणी सांगावे, तर ज्यांनी इमान आणि सत्ता यांची गल्लत केली आहे त्यांनी?

मुळात असे सांगणे हा मिलावटी हिंदुत्वाचा प्रकार तर आहेच, पण नमकहरामीचे टोक आहे. कश्मीरात कालच हिंदू व शिखांना नव्याने धमक्या देण्यात आल्या. ‘घराबाहेर पडाल तर याद राखा’ अशी पोस्टर्स कश्मीरातील हिंदूंच्या घराबाहेर लावण्यात आली, तर काही ठिकाणी हिंदूंनी आपली घरेदारे सोडावीत म्हणून दहशत सुरू आहे.

त्यामागे पाकिस्तानचा अदृश्य हात आहे. तिकडे पाकडे हिंदूंना मारत आहेत व इकडे अहमदाबादेत मात्र पाकडय़ांवर फुले उधळून त्यांचे स्वागत होत आहे. मिलावटी मिध्यांना हिंदुत्वातील ही भेसळ दिसू नये याचे आश्चर्यच वाटते.

पाकिस्तान व हिंदुत्वाचा जेव्हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कठोर होती. “जोपर्यंत कश्मीरातील हिंदूंचा रक्तपात थांबत नाही तोपर्यंत पाकडयांचे पाय माझ्या देशात पडू देणार नाही,” या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचा मिध्यांना विसर पडलेला दिसतो.

पाकडयांचे स्वागत करणे, कश्मीरात पंडित व जवान मारले जात असताना तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसणे हे हिंदुत्व नसून नामर्दानगीच आहे.

मुख्यमंत्रीपदी बसलेल्या मिध्यांना आता मोदी-शहांच्या नामस्मरणाचे व्यसन जडले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण स्वतस शिवसेना समजणाऱ्या या लोकांनी आपली प्रतिष्ठा भाजपचरणी ठेवून गुलामगिरी पत्करल्याचे जाहीर केले आहे.

शिवसेना व समाजवादी विचारांच्या मंडळींचे मनोमीलन झाल्याबद्दल मिधे गटाच्या दाढीला आग लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना हे पटले नसते वगैरे मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. शिवसेना व समाजवादी एकत्र आले हे भाजपास पटलेले दिसत नाही.

म्हणून मुख्यमंत्री मिरच्या झोंबल्याप्रमाणे तडतडत आहेत. क मात्र नक्की, संघ परिवाराप्रमाणे समाजवादी ढोंगी किंवा दुटप्पी नाहीत. त्यांच्या कारवाया गुप्त नसतात. समाजवादी व शिवसेनेतील वाद उघड आहेत.

पंचवीस वर्षे मैत्रीचे नाटक करून पाठीत खंजीर खुपसण्याचे कृत्य समाजवाद्यांनी केले नाही. महाराष्ट्र व राष्ट्र जाती-धर्माच्या नावाने पेटवून फोडण्याचे कारस्थान त्यांनी रचलेले नाही.

देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात समाजवादी उघडपणे सहभागी होते व देश स्वतंत्र झाल्यावर समाजवाद्यांनी आपापल्या घरावर तिरंगे फडकवून स्वातंत्र्याचे स्वागत केले.

इंदिरा गांधी हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत, त्यामुळे देशाच्या लोकशाहीस धोका आहे याची खात्री पटताच समाजवादी विचारांचे जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालीच समग्र क्रांतीचा, दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा झाला व सर्व समाजवादी मंडळी त्यात सहभागी झाली होती.

म्हणूनच देशात परिवर्तन झाले. गोवा मुक्ती संग्रामात संघ कोठेच नव्हता, पण राममनोहर लोहिया, मधू दंडवते, मधू लिमये हे समाजवादी पोर्तुगीजांशी लढण्यात आघाडीवर होते.

आणीबाणीविरोधात समाजवादी जॉर्ज फर्नांडिस यांनी तर सशस्त्र लढय़ाची उभारणी केली व त्याचा फायदा भाजपने घेतला. समाजवादी हे धर्मनिरपेक्ष, तरीही वाजपेयींच्या सरकारात ते सामील झाले.

समाजवादी सरकारात आल्याने भाजपचे ‘हिंदुत्व’ मिलावटीराम झाले नव्हते काय? मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढच्या काळात विधिमंडळ ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे.

इतिहासाची पाने चाळली तर त्यांच्या अगाध ज्ञानाची त्यांनाच लाज वाटेल. ‘उचलली जीभ लावली टाळय़ाला’ हा त्यांचा प्रकार राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहे. मिध्यांनी पक्षांतर केले व ढोंगांतरही केले. त्यातून निर्माण झालेला ‘माजवाद’ जनता कायमचा गाडेल!

सौजन्य – सामना

महत्त्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe