Weather Update | कुठं थंडी, तर कुठं प्रचंड उकाडा, पाहा हवामान अंदाज

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह देशातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. कारण देशातून मान्सून माघारी फिरला आहे.

सध्या परतीच्या पावसाचा प्रवास अखेरच्या टप्प्यात आलेला असून राज्यात दिवसेंदिवस उन्हाची दाह वाढत चालली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण होताना दिसत आहे.

अशात येत्या 24 तासात राज्यात ऑक्टोबर हिटचं प्रमाण वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

येत्या 24 तासात राज्यामध्ये ऑक्टोबर हिटचं प्रमाण आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

त्यामुळे नागरिकांना मोठ्या हवामान बदलांना सामोरं जावं लागू शकतं. मुंबई, नवी मुंबई, पालघर, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये उकाडा नागरिकांना हैराण करेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावं, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं  आहे. हा वाढता उकाडा ऑक्टोबरच्या अखेरीस कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

North India is experiencing cold weather

दरम्यान, राज्यामध्ये ऑक्टोबर हिटचं प्रमाण वाढत असताना उत्तर भारतामध्ये थंडीची चाहूल लागली आहे. पश्चिमी झंजावातामुळे दिल्लीमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये तापमानात घट होताना दिसत आहे.

त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये थंडीची चाहूल लागलेली असून केदारनाथ धाम येथे बर्फवृष्टी झाली आहे. पुढील 24 तास या भागात बर्फवृष्टी सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Weather Update) आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe