Maratha Reservation | सभेदरम्यान सरकारला हिंसाचार करायचा होता? – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: शनिवारी (14 ऑक्टोबर) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अंतरवाली सराटी या गावात जाहीर सभा घेतली. या सभेसाठी लाखो मराठा बांधवांनी गर्दी केली होती.

या सभेनंतर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सभेदरम्यान राज्य सरकारला हिंसाचार घडवून आणायचा होता का? असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरंगे यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

The internet was turned off during our meeting – Manoj Jarange

प्रसार माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे म्हणाले, “आमच्या सभेवर राज्य सरकारची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांनी आमच्या सभेदरम्यान इंटरनेट बंद करून टाकलं होतं.

आमचे मोबाईल बंद केल्यावर जनता दबेल, असं त्यांना वाटलं होतं. परंतु, शेवटी जनता जनता आहे. तुमच्यामध्ये अंतर्गत कुजबूज आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल.

राज्य सरकारने मीडिया आणि आमचं इंटरनेट बंद केलं असलं तरी, शासनाचं नेट बंद करायचं काम जनतेच्या हातात आहे. राज्य शासनाने आमची लाईट देखील बंद केली होती. आमच्या लोकांना पाणी प्यायला मिळालं नाही”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आमच्या इथल्या 27 गावांची लाईट बंद होती. ऊर्जा मंत्रांनी याबाबत चौकशी करायला हवी. आमच्या सभेच्या दिवशी लाईट बंद करायचं कारण काय होतं? याचा शोध सरकारने घ्यायला हवा.

हे काम करणाऱ्यांना सरकारने तातडीने कामावरून काढायला हवं. मनोज जरांगे हिंसाचार घडून आणतील, असं स्टेटमेंट देण्यात आलं होतं. हे विधान करणारे सरकार पक्षाचेच कार्यकर्ते आहेत.

राज्य सरकारला हिंसाचार घडून आणायचा होता का? करोडो संख्येने सभेसाठी मराठा समाज एकत्र आला होता. माझ्या एका शब्दावर मराठा समाज मागे फिरला. आमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाला नाही. मात्र, राज्य शासनाला हिंसाचार घडवून आणायचा होता का?”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe