Sudhir Mungantiwar | चंद्रपूर: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं आणण्यासाठी लंडनला गेले होते.
परंतु, वाघ नखं न घेता परतले आहे. यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर खोचक शब्द टीका केली.
हा करार करण्यासाठी मुनगंटीवार यांना लंडनला जाण्याची गरज नव्हती, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्राची आस्था आहे.
बच्चू कडू यांच्याकडून आम्हालाही अपेक्षा नव्हती. यासंबंधीचा करार ऑनलाईन होत नसतो. विधिमंडळ अधिवेशनाचा होणारा खर्च वाचावा म्हणून हा करार ऑनलाईन करा, असं बच्चू कडू यांनी म्हटलं असावं.”
Sudhir Mungantiwar did not need to go to London – Bacchu Kadu
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार लंडनमधून वाघ नख न घेता परतल्यावरून बच्चू कडू यांनी त्यांच्यावर खोचक शब्द टीका केली होती. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं आणण्यासाठी सुधार मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना लंडनला जाण्याची गरज नव्हती.
हा करार ऑनलाईन देखील झाला असता. लंडन दौऱ्यावर 50 ते 60 लाखांचा खर्च झाला असेल. हा खर्च करण्याची त्यांना काहीच गरज नव्हती.”
महत्वाच्या बातम्या
- Govt Job Opportunity | SSC मार्फत नोकरीची संधी! ‘या’ विभागात भरती प्रक्रिया सुरू
- Nitesh Rane | मनोज जरांगेंना जास्त अभ्यास करण्याची गरज – नितेश राणे
- Ashish Shelar | बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राने काय करुन दाखवलं? आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंचा घेतला समाचार
- Bacchu Kadu | बच्चू कडू जाणार अयोध्या दौऱ्याला; श्रीरामाला करणार कापूस, सोयाबीन अर्पण
- Sanjay Raut | CM शिंदेंना समाजवाद हा शब्द माहिती आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल