Nitesh Rane | मनोज जरांगेंना जास्त अभ्यास करण्याची गरज – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. 14 ऑक्टोबर 2023 रोजी अंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाहीर सभा घेतली.

या सभेमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे. विरोधकांच्या या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे.

नितेश राणे म्हणाले, “कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागू देता आमचं सरकार मराठ्यांना आरक्षण देईल. आमचं सरकार तेवढं सक्षम आहे.

हीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (knath Shinde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केली आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे दुसरी काही भूमिका घेणार असतील तर आम्ही त्यांची समजूत काढू.

मनोज जरांगे यांना कदाचित जास्त अभ्यास करण्याची गरज आहे, मनोज जरांगे आमचे आहे, त्यामुळं  याबद्दल आम्ही त्यांची समजूत काढू.

मराठ्यांना आरक्षणच हवं आहे ना? त्यांना ते कसं द्यायचं, तो सर्वस्वी आमचा प्रश्न आहे. संविधानाच्या अंतर्गत राहून आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न करू.”

If the government does not give us reservation, we will do a big protest – Manoj Jarange

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये बोलत असताना ते म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही सरकारला 40 दिवसांचा कालावधी दिला होता.

हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एकतर माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर मराठा समाजाच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल. सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू. मी सरकारला दिलेला शब्द पाळला आहे, त्याचप्रमाणे सरकारने देखील आम्हाला दिलेला शब्द पाळायला पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.