Sanjay Raut | CM शिंदेंना समाजवाद हा शब्द माहिती आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Sanjay Raut | मुंबई: शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर नेहमी आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्यावर खोचक शब्द टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजवाद शब्द माहित आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज (16 ऑक्टोबर) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द माहित आहे का? समाजवादाची व्याख्या त्यांना माहित आहे का?

बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी नेत्यांचे संबंध विचारा काय होते. बाळासाहेब ठाकरे आणि त्या वेळच्या समाजवादी नेत्यांनी एकमेकांवर टीका टिपणी केलेल्या आहेत.

मात्र, महाराष्ट्राच्या भल्यासाठी समाजवादी नेते आणि बाळासाहेब ठाकरे अनेकदा एकत्र आले होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सीमा प्रश्नाचा लढा इत्यादी समस्या सोडवण्यासाठी समाजवादी नेते आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारा की त्यांनी बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव ऐकलं आहे का?”

Socialism has never spoken of breaking up Maharashtra – Sanjay Raut

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच सर्वात जास्त समाजवादी नेते राहायचे आणि काम करायचे. जात आणि धर्माच्या आधारावर या लोकांनी कधी देश तोडायचा प्रयत्न नाही केला.

ज्या भारतीय जनता पक्षाच्या पदराखाली एकनाथ शिंदे जाऊन बसले आहे, त्या भाजपला सत्ता देण्याचं काम समाजवादी नेत्यांनी केलं आहे. यामध्ये जॉर्ज फर्नांडिस, जयप्रकाश नारायण आणि चंद्रशेखर यांचा समावेश होता.

त्यामुळे समाजवाद काय असतो? हे एकदा एकनाथ शिंदे यांनी समजून घ्यायला हवा. समाजवादाने महाराष्ट्र तोडण्याची भाषा कधी केली नाही.

महाराष्ट्र तोडण्याची भाषा संघ परिवाराने केली आहे आणि ते सध्या संघ परिवारासोबत आहेत. त्यामुळे त्यांना विधिमंडळाच्या ग्रंथालयात जाऊन जुना रेकॉर्ड तपासण्याची अत्यंत गरज आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe