Share

Maratha Reservation | मनोज जरांगेंनी टोकाचं पाऊल उचलू नये – बच्चू कडू

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणावरून सरकार विरोधात लढा सुरू केला आहे.

मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी या गावामध्ये जरांगे यांची आज भव्य सभा पार पडली.

येत्या दहा दिवसात शासनाने मराठ्यांना आरक्षण द्यावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. अशात आता मनोज जरांगे यांच्या या सभेवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

The government is thinking positively about reservation for Maratha community -Bacchu Kadu

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Maratha Reservation) टोकाचं पाऊल उचलून आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकार सकारात्मक विचार करत आहे. मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात अडकला आहे. सुप्रीम कोर्टाने जर मराठ्यांच्या बाजूने निकाल दिला तर त्यांना लगेच आरक्षण मिळेल.”

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी आम्ही राज्य सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता.

त्यापैकी 30 दिवस झालेले असून आणखीन दहा दिवस शिल्लक आहे. सरकारला दहा दिवसात मराठा समाजाला आरक्षण घ्यावं लागेल. सरकारने दहा दिवसात आम्हाला आरक्षण दिलं नाही तर माझं मरण पाहावं लागेल. एकतर मराठा समाजाच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल.”

महत्वाच्या बातम्या

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणावरून सरकार विरोधात लढा सुरू केला आहे. मनोज …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now