Vijay Wadettiwar | दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंची फसवणूक केलीये – विजय वडेट्टीवार

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं होतं.

त्यानंतर त्यांनी आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. आज त्यातील 30 दिवस पूर्ण झाले आहे. आज मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाहीर सभा घेतली.

या सभेवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंची फसवणूक केली असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

We are not opposed to Maratha reservation – Vijay Wadettiwar

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायला हवं, ही भूमिका मी स्पष्ट केली होती.

मनोज जरांगे यांचं भाषण मी ऐकलं आहे. त्यातून मला एक गोष्ट स्पष्टपणे दिसली आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची फसवणूक केली आहे.

कोणाचे कोण पोपाट म्हणून बोलतात, हे जरांगे यांच्या भाषणातून स्पष्ट झालं आहे. सरकारला हा विषय तातडीने सोडवण्याची गरज आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा.”

दरम्यान, या सभेमध्ये बोलत असताना मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला इशारा दिला आहे. ते म्हणाले, “एकतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विजयाची यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी आम्ही राज्य शासनाला 40 दिवसांची मुदत दिली होती. त्यातले 30 दिवस संपलेले असून शासनाच्या हातात आता फक्त दहा दिवस राहिले आहे.

या दहा दिवसांमध्ये सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू. आरक्षणासाठी मी आज राज्य शासनाला शेवटची विनंती करत आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला, त्याप्रमाणे सरकारने देखील त्यांनी दिलेला शब्द पाळायला पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe