Share

IND vs PAK | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून गिल बाहेर? पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11

IND vs PAK | टीम महाराष्ट्र देशा: आज (14 ऑक्टोबर) वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहे. वनडे वर्ल्ड कप मधील सुरुवातीचे दोन सामने जिंकून भारतीय संघ तिसऱ्या सामन्यासाठी सुसज्ज झाला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याकडे संपूर्ण देशासह जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांचं … Read more

Published On: 

IND vs PAK | टीम महाराष्ट्र देशा: आज (14 ऑक्टोबर) वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहे.

वनडे वर्ल्ड कप मधील सुरुवातीचे दोन सामने जिंकून भारतीय संघ तिसऱ्या सामन्यासाठी सुसज्ज झाला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याकडे संपूर्ण देशासह जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची क्रिकेटच्या चाहते नेहमी आतुरतेने वाट बघत असतात. आज आमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 काय असेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अशात आता टीम इंडियाची प्लेइंग-11 समोर आली आहे.

पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये रोहित शर्मा (कर्णधार), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, के एल राहुल, विराट कोहली, इशान किशन/ शुभमन गिल, शार्दुल ठाकूर/मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे.

Shubman Gill was infected with dengue

दरम्यान, वनडे वर्ल्ड कप सुरू असताना शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे त्याला या स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकावे लागले.

परंतु, पाकिस्तान विरुद्धच्या (IND vs PAK) सामन्याआधी तो नेटमध्ये सराव करताना दिसला आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये गिल खेळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सामन्यामध्ये गिलचे पुनरागमन झाले तर इशान किशनला या सामन्यादरम्यान बाहेर बसावे लागू शकते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही