Sanjay Raut | महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री करताय – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: काल (13 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली ही सुनावणी पार पडली.

ही सुनावणीदरम्यान आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना पुन्हा एकदा सुनावलं आहे.

आमदार अपात्रतेवर (MLA Disqualification) निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा आहे आणि याचा आम्ही आदर देखील करतो. मात्र, याबाबत दिरंगाई आणि चालढकल होत राहणं योग्य नाही.

आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर पुढच्या निवडणुकांपर्यंत तरी निर्णय घ्या. मंगळवार म्हणजेच 17 ऑक्टोबर पर्यंत शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाचं वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांनी सादर करावं, नाही तर आम्ही आदेश देऊ, असं सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ठणकावून सांगितलं आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

The Assembly Speaker is protecting the unconstitutional government – Sanjay Raut

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे आणि विधानसभेचे कान आजपर्यंत कोणत्याही न्यायालयाने उपटले नव्हते.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक अत्यंत मोठी परंपरा आहे. अनेक महान लोक या खुर्च्यांवर बसलेले आहेत. त्याचबरोबर या लोकांनी संविधानाचं आणि कायद्याचं संरक्षण केलं आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “गेल्या एका वर्षापासून राज्यात बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार आहे. त्या घटनाबाह्य सरकारचं संरक्षण करण्याचं काम विधानसभा अध्यक्ष करत आहे.

एखाद्या खुनी माणसाला आश्रय द्यावा, त्याचबरोबर त्याला आणखीन खून करण्यासाठी उत्तेजन घ्यावं, त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष या घटनाबाह्य सरकारचं रक्षण करत आहे.

विधानसभा अध्यक्षांसाठी सर्वोच्च न्यायालयाने पोरखेळ हा शब्द वापरला आहे. आपल्या महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.