IND vs PAK | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी आयसीसीची मोठी घोषणा, शुभमन गिलबाबत घेतला निर्णय

IND vs PAK | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात भारतीय संघासाठी धमाकेदार झाली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहे.

टीम इंडियाचा तिसरा सामना उद्या म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

टीम इंडियाचा धडाकेबाज ओपनर शुभमन गिलला (Shubman Gill) डेंग्यूमुळे वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्याला मुकावं लागलं होतं. मात्र, पाकिस्तान विरुद्ध होणारा सामना गिल खेळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. तत्पूर्वी आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.

The ‘ICC Player of the Month’ award has been given to Shubman Gill

टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. परंतु, डेंग्यूमुळे त्याला वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकावा लागलं.

त्यानंतर तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी नेटमध्ये सराव करताना दिसला आहे. त्यामुळे तो पाकिस्तान विरुद्धचा सामना खेळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

अशात आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्याचा ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार आयसीसीने शुभमन गिलला दिला आहे.

दरम्यान, प्रत्येक महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंची नावे या पुरस्काराच्या नामांकनासाठी दिली जातात. त्यानुसार आयसीसीने सप्टेंबर महिन्यासाठी डेव्हीड मलान, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंची निवड केली होती. शुभमन गिलने सप्टेंबर महिन्यात हा पुरस्कार पटकावला आहे. त्याने या महिन्यात तब्बल 480 धावा केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.