Ajit Pawar | शरद पवार गटाला मोठा झटका! अजित पवारांकडून सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल

Ajit Pawar | नवी दिल्ली: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तत्पूर्वीच अजित पवार गटाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार गटाच्या तीन आमदारांनी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटाच्या या खेळीनंतर शरद पवारांच्या चिंतेत भर पडली आहे.

Petitions have been filed by Narhari Zirwal, Anil Patil and Chhagan Bhujbal

जयंत पाटील यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी आहे. तत्पूर्वी अजित पवार गटाच्या तीन आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

नरहरी झिरवळ (Narhari Zirwal), अनिल पाटील (Anil Patil) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी याचिका दाखल केल्या आहे.

आमची भूमिका समजून घ्यावी. त्याचबरोबर आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, अशी विनंती या आमदारांनी या हस्तक्षेप याचिकेच्या माध्यमातून केली आहे. अजित पवार गटाच्या याचिकेवर  सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर सुनावणी होणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्देश द्यावे, अशी मागणी शरद पवार गटाने या याचिकेच्या माध्यमातून केली होती.

शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) गटाने हस्तक्षेप याचिका दाखल करून शरद पवार गटाला मोठा झटका दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.