Raj Thackeray | टोलाचा निर्णय होणार शिवतीर्थावर? राज ठाकरे आणि महायुतीच्या मंत्र्यांची बैठक सुरू

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील टोलाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या बैठकीमध्ये टोलाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला नसल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळं या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दादा भुसे (Dada Bhuse) दाखल झाले आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी टोलाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि दादा भुसे यांची चर्चा सुरू आहे. या बैठकीमध्ये टोलाच्या मुद्द्यावर निर्णय होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

This meeting has started at 8.30 am today

टोलाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री दादा भुसे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहे. गेल्या दोन तासापासून दादा भुसे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

आज सकाळी 8.30 वाजता ही बैठक सुरू झाली आहे. टोल नाके, टोलाचा वाढता दर, राज्यातील टोलनाके कसे बंद करता येईल? टोलाचा पैसा कुठे जातो? इत्यादी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या बैठकीमध्ये या समस्या सुटणार असल्याच्या चर्चा देखील राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती देणार आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) टोलाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहे. टोल नाके जाळून टाकण्याची भाषा त्यांनी केली आहे.

टोलच्या मुद्द्यावरून काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी टोल संदर्भात या बैठकीत चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, काल झालेल्या बैठकीमध्ये या समस्यांवर तोडगा निघालेला नाही.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.