Sharad Pawar | अजित पवार मुख्यमंत्री होणार, हे स्वप्न राहणार – शरद पवार

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाल्यापासून ते राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याचे चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

त्याचबरोबर अजित पवारांनी देखील मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवारांवर खोचक शब्द टीका केली आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं होतं. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर एक बहिण म्हणून सगळ्यात पहिले त्यांच्या गळ्यात हार घालणारी मी असेल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

त्यांच्या या विधानावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य ठीक आहे. मात्र, ही कधी न घडणारी गोष्ट आहे.

हे एक फक्त स्वप्न आहे”, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्नचं राहणार असल्याचं म्हटलं आहे.

We three parties in Mahavikas Aghadi will stay together – Sharad Pawar

पुढे बोलताना ते (Sharad Pawar)  म्हणाले, “महाविकास आघाडीतील आम्ही तिन्ही पक्ष एकत्र राहणार आहोत. नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र आहोत.

उद्या राज्यामध्ये त्यांची सत्ता यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या जनसामान्यांचा ज्या पद्धतीचा प्रतिसाद आहे, त्यामध्ये मतपरिवर्तन झालं तर राज्यामध्ये आमची सत्ता येऊ शकते. त्याचबरोबर आमच्यामध्ये आणखी काही पक्षांचा समावेश होऊ शकतो.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.