Uddhav Thackeray | मुंबई: दरवर्षी दसऱ्याला शिवसेनेचा शिवाजी पार्कवर भव्य मेळावा पार पडतो. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद सुरू होते.
या मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटाने मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केला होता. परंतु, महानगरपालिकेच्या निर्णयाआधी शिंदे गटानं त्यांचा अर्ज मागे घेतला. यानंतर मुंबई महानगरपालिकेने ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे.
Thackeray group got permission to hold Dasra melava at Shivaji Park
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दसऱ्याच्या दिवशी उपस्थितांना संबोधित करणार आहे.
गेल्या वर्षी देखील ठाकरे गटालाचं शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. या मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली.
तर एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने यंदा पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने येणार आहेत.
दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी करण्यात आलेला अर्ज शिंदे घेतला मागे घेतला. याबाबत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी माहिती दिली.
“दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण ! शिवसैनिकांसाठी हा महोत्सवच असतो. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली ५० वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंड पणे देत आले.
यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा व हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून शिवसेना नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचे जाहीर करून सामंजस्याची भूमिका घेतली.
त्याबद्दल त्यांचे शिवसैनिक व हिंदुजनतेच्या वतीने जाहीर आभार ! तसेच आपल्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, दसरा मेळाव्यासाठीचा अर्ज मागे घेत आहोत”, असं सदा सरवणकर यांनी म्हटल होतं.
महत्वाच्या बातम्या
- Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! ‘या’ महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती सुरू
- Nawab Malik | नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, जामिनीला मिळाली 3 महिन्यांची मुदतवाढ
- Jayant Patil | ‘कंत्राटी सरकारचा’ जाहीर निषेध; ‘त्या’ निर्णयावरून जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका
- Supriya Sule | भाजप म्हणजे जुमला पक्ष – सुप्रिया सुळे
- IND vs AFG | अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहितची शानदार कामगिरी, एकट्याने केले ‘हे’ मोठे विक्रम