Share

Jayant Patil | ‘कंत्राटी सरकारचा’ जाहीर निषेध; ‘त्या’ निर्णयावरून जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारने मुंबई पोलीस दलात कंत्राटी स्वरूपात 3000 जवानांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधाऱ्यांचा हा निर्णय विरोधकांना पटलेला नाही. त्यामुळे या निर्णयावरून विरोधकांनी राज्य सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. खाजगीकरणाच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या या ‘कंत्राटी सरकार’ चा जाहीर निषेध!, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

Published On: 

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारने मुंबई पोलीस दलात कंत्राटी स्वरूपात 3000 जवानांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधाऱ्यांचा हा निर्णय विरोधकांना पटलेला नाही.

त्यामुळे या निर्णयावरून विरोधकांनी राज्य सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. खाजगीकरणाच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या या ‘कंत्राटी सरकार’ चा जाहीर निषेध!, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Contracts are being awarded to a few private companies – Jayant Patil 

ट्विट करत जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “राज्य सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीची कक्षा रुंदावत चालले आहे. मुंबई पोलीस दलात देखील तब्बल 3000 कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला गेला.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. कंत्राटी पद्धतीने रुजू झालेल्या पोलिसांची विश्वासार्हता, माहितीची गोपनीयता याबद्दल सरकारने विचार केला आहे का ही शंकाच आहे.

मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असताना, सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवत आहे. कुशल व अकुशल नोकऱ्यांना कंत्राटी पद्धतीने भरून सुशिक्षित तरुणांचे शोषण करण्याचा हा प्रकार आहे.

काही मोजक्या खाजगी कंपन्यांना कंत्राट दिले जात आहेत. नक्की कोणाच्या फायद्यासाठी सरकार हा निर्णय रेटून नेत आहे? खाजगीकरणाच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या या ‘कंत्राटी सरकार’ चा जाहीर निषेध!”

दरम्यान, या प्रकरणावरून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “मुंबई पोलीस दलात कंत्राटी स्वरूपात तीन हजार जवानांची भरती करण्याचा निर्णय चुकीचा आहे.

त्यासाठी दिलेली कारणेही तर्कसंगत नाहीत. मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असून, आगामी काळातील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमिवर सुरक्षा व्यवस्थेसाठी तात्पुरत्या स्वरूपात ही भरती करण्यात येत असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.

मात्र, मनुष्यबळाची ही कमतरता अचानक निर्माण झालेली नाही किंवा हे सण-उत्सव देखील अचानक ठरलेले नाहीत. कोणते सण केव्हा येणार हे राज्य सरकारला अगोदर ठाऊक नव्हते का?

त्या अनुषंगाने वेळीच नियमित भरतीप्रक्रिया का सुरू झाली नाही? राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून तातडीने नियमित भरतीप्रक्रिया सुरू करावी, अशी आमची मागणी आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही