Weather Update | पुढील 24 तास ‘या’ ठिकाणी कोसळणार परतीचा पाऊस, हवामान विभागाने दिला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह देशातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनचा हंगाम जवळपास संपलेला असून काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे.

परंतु, जाता जाता बहुतांश ठिकाणी पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

The weather department has warned of heavy rain again in the next 24 hours

या आठवड्यामध्ये हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखला पावसाने चांगलं झोडपून काढलं आहे. तर येत्या 24 तासात या भागात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

त्याचबरोबर मध्य अरबी समुद्राच्या काही भागातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आज (12 ऑक्टोबर) देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Update) वर्तवली आहे.

दरम्यान, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, ओडीसा, तेलंगाना, महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील काही भागातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे या ठिकाणी पुढील 24 तासात मान्सून (Weather Update) माघारी फिरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राज्यातून मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झालेली असून राज्यातून मान्सून पूर्णपणे बाहेर गेला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.