Chitra Wagh | जन्माला येणाऱ्या मुलीला 1 लाख 1 हजार रूपये मिळणार म्हणून सुप्रिया सुळेंच्या पोटात का दुखतय? – चित्रा वाघ

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने ‘लेक लाडकी’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेअंतर्गत जन्माला आलेल्या मुलीला 1 लाख 1 हजार रुपये लाभ मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक शब्द टीका आहे.

भारतीय जनता पक्ष महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जन्माला येणाऱ्या मुलीला 1 लाख 1 हजार रूपये मिळणार आहेत तर सुप्रिया सुळेंच्या का पोटात दुखतयं, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “ओ ऽऽऽऽ मोठ्ठया ताई (सुप्रिया सुळे), कुठल्याही चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचे कर्तव्यचं आहे ना जणू ?

राज्यातील आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी १०० कोटींची वांगी नाही ना पिकवू शकत ताई. नविन जन्माला येणाऱ्या मुलीला १लाख १ हजार रूपये मिळणार आहेत तर तुमच्या का पोटात दुखतयं ती लखपती होत असेल तर तुमच्या करोडपतीपणावर थोडीचं कुणी आघात करतयं ?

राहिला प्रश्न आमच्या पक्षातील महिलांचा तर तर भाजपा इतकी चांगली वागणूक अन्य पक्षात नाहीचं. आजच तुमच्या कार्यक्रमात महिसांनी गोंधळ का घातला ?

त्यांनी डावललं जात असल्याची भावना का व्यक्त केली याचं चिंतन करा मोठ्ठया ताई. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून. ही तऱ्हा जुनी झाली. ताई अब पब्लीक सब जानती है. बर का मोठ्ठ्या ताई.”

BJP does not give justice to any woman – Supriya Sule

दरम्यान, लेक लाडकी या योजनेवरून सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “लेक लाडकी, लेक लाडकी असं भारतीय जनता पक्ष सातत्याने म्हणतं आहे. मात्र, हा पक्ष महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे.

मी त्यांना दिल्लीत अत्यंत जवळून पाहिलं आहे. कोणत्याही महिलेला ते न्याय देत नाही. भारतीय जनता पक्षाने संसदेची नवीन इमारत उभी केली. त्या इमारतीचं उद्घाटन करण्याचा मान एका महिलेचा होता. मात्र, भाजपनं त्यांना हा मान दिला नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.