Supriya Sule | भाजपकडे कोणी टॅलेंट नाही, म्हणून त्यांना बाहेरून माणसं घ्यावी लागतात – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटासह भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

भारतीय जनता पक्षाकडे कोणी टॅलेंट नाहीये म्हणून, त्यांना बाहेरून माणसं घ्यावी लागतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गट आणि भाजपमध्ये नवा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

I am very happy to meet the Chief Minister of Assam – Supriya Sule 

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “आसामच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मला अत्यंत आनंद होतो. कारण आसामच्या संपूर्ण भागात  त्यांचा कंट्रोल आहे.

त्यांची आणि आमची भेट झाल्यावर मी त्यांना नेहमी थम्स अप करते. कारण ते मूळ काँग्रेस पक्षाचे आहेत. आसाममध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं केलं असलं तरी ते मूळ काँग्रेस पक्षाचे आहेत.

भारतीय जनता पक्षामध्ये कोणी टॅलेंट नाहीये म्हणून त्यांना बाहेरून माणसं घ्यावी लागतात. त्या माणसांच्या माध्यमातून आपले विचार तिकडे जातात आणि हे अत्यंत चांगलं आहे.”

पुढे बोलताना त्या (Supriya Sule) म्हणाल्या, “आजची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. एक काळ होता जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले की मोठा भूकंप होईल, असं म्हटलं जायचं आणि त्याची मोठी बातमी व्हायची.

परंतु आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पालकमंत्री ठरवण्यासाठी जातात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पालकमंत्री ठरवण्यासाठी दिल्लीला जायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे वेळ होता. मात्र, राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.