Ashish Shelar | आदित्य ठाकरेंसारखे टवाळखोर वाघ नखांवर प्रश्न उपस्थित करताय – आशिष शेलार

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Ashish Shelar | मुंबई: लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काही सवाल उपस्थित केले होते.

भारतामध्ये आणली जाणारी वाघ नख खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे की शिवकालीन आहे, याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.

आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंसारखे टवाळखोर वाघ नखावर प्रश्न उपस्थित करत असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Tiger claws will come to Maharashtra in the month of November

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नख महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तीन वर्षाचा करार केला आहे. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात वाघ नख येणार आहे.

मात्र, त्याआधी राज्यामध्ये जे काही टवाळखोर होते, ते आता शंकेखोर झाले आहे. या टवाळांनी वाघ नखांवर प्रश्न उपस्थित केला आहे. इतिहास तज्ञ या विषयावर बोलतील.

मात्र, ज्यांच्या मनात, हृदयात आणि बुद्धीत फक्त टवाळक्या करणं आणि शंका घेणं एवढंच आहे, ते आदित्य ठाकरे वाघ नखांवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. हा व्यक्तीचा नसून विचारांचा विषय आहे.”

पुढे बोलताना ते (Ashish Shelar) म्हणाले, “या विचारांचा कोथळा बाहेर काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुंबईत राहुल सोलापूरकर यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे.

त्याचबरोबर आपल्या शौर्यगाथा जाणून घेण्यासाठी नंदेश उमाप यांच्या शायरीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.

त्यामुळे ज्यांच्या मनात याबद्दल अजूनही शंकेची कीड वळवळत आहे, त्यांना त्यांच्या बुद्धीत भर घालायचा असेल तर त्यांनी त्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित रहावं.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe