Parth Pawar | अजित पवारांच्या जागी पार्थ पवार सांभाळू शकतात ‘ते’ पद

Parth Pawar | टीम महाराष्ट्र देशा: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (10 ऑक्टोबर) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

गेली 32 वर्ष अजित पवार बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून या बँकेचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र कामाचा व्याप वाढल्यामुळे अजित पवारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद आहे. हे सर्व पद सांभाळत असताना अजित पवारांना बँकेचं काम करण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.

अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठी आर्थिक प्रगती केली आहे. अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी पार्थ पवारांची (Parth Pawar) वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

In 1991, Ajit Pawar became the Director of Pune District Central Cooperative Bank

दरम्यान, 1991 मध्ये अजित पवार जिल्हा बँकेचे संचालक झाले होते. तेव्हा 558 कोटी रुपये एवढा बँकेचा एकूण व्यवसाय होता. अजित पवार यांनी बँकेचे सूत्र हातात घेतल्यानंतर आज या बँकेचा व्यवहार 20712 कोटी रुपये एवढा वाढला आहे.

अजित पवार यांनी बँकेला प्रगतीपथावर नेण्याचं काम केलं. अजित पवारांनी बँकेच्या संचालक पदावरून राजीनामा दिला असला तरी येत्या काळात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच बँकेतील कामं होतील, असं बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.