Share

Weather Update | ‘या’ ठिकाणी कोसळणार परतीचा पाऊस, हवामान खात्याने दिला अंदाज

🕒 1 min readWeather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यासह देशातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. देशातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यास म्हणजेच परतीच्या पावसाला सुरुवात झालेली दिसत आहे. देशातील बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत चालला आहे. अशात काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात … Read more

Published On: 

🕒 1 min read

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यासह देशातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. देशातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यास म्हणजेच परतीच्या पावसाला सुरुवात झालेली दिसत आहे.

देशातील बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत चालला आहे. अशात काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Rain is forecast at most places in the next 24 hours

सोमवारी राज्यासह देशातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. अशात येत्या 24 तासात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील दोन-तीन दिवस कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर आणि मेघालय या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

तर दुसरीकडे झारखंड, बिहार, छत्तीसगड, बंगाल आणि ओडिसाच्या बहुतांश भागातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनने आपला पाय काढून घेतला आहे. परिणामी त्या ठिकाणी उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे.

मध्य महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असून काही दिवसात मान्सून पूर्णपणे माघार घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर मुंबई आणि ठाणे परिसरातून मान्सून माघारी फिरला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!