Share

Chitra Wagh | ये डर अच्छा है; ‘त्या’ मुद्द्यावरून चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. यामध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्लाबोल चढवताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. जनतेला सुरक्षित ठेवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री करू नका असं सुप्रिया सुळे यांनी … Read more

Published On: 

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. यामध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्लाबोल चढवताना दिसतात.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती.

जनतेला सुरक्षित ठेवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री करू नका असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस या प्रामाणिक गृहमंत्र्यांची भिती तुमच्यासारख्यांना वाटत असेल तर  ‘ये डर अच्छा है’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Devendra ji has done the work of bringing illegal behavior to justice – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “ओऽऽऽ मोठ्ठया ताई….(सुप्रिया सुळे) हा लाडीक ताईहट्ट दादा पुरवणार नाहीत ..! तुम्ही भाऊबीजेची दुसरी कुठली तरी ओवाळणी मागून पाहा त्यांच्याकडे.

तुमच्या काळात गृह खात्याला लागलेलं ‘देशमुखी’ ग्रहण आता सरलंय. देवेंद्रजींच्या खंबीर नेतृत्वाखाली गृह खातं राज्यापुढच्या कुठल्याही आव्हानावर मात करण्यास सक्षम आहे. बाकी तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांची भिती का वाटतेय ते आम्हाला माहिती आहे.

बेकायदा वागणा-यांना वठणीवर आणण्याचं काम देवेंद्र जी यांनी केलंय व ते करताहेत. देवेंद्र फडणवीस या प्रामाणिक गृहमंत्र्यांची भिती तुमच्यासारख्यांना वाटत असेल तर ये डर अच्छा है !”

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. त्या म्हणाल्या, “दादाला (अजित पवार) एक विनंती आहे की जेव्हा तू मुख्यमंत्री होशील तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री करू नको. जनतेला सुरक्षित ठेवायचं असेल तर इतर कुणालाही गृहमंत्री कर मात्र फडणवीस यांना गृहमंत्री करू नको.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही