Share

Uddhav Thackeray | शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा कायम – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा शिवाजी पार्क येथे मेळावा होतो. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेणार? यावरून वाद निर्माण झाला होता. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटाने दीड महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, महापालिकेने अद्याप कोणत्याही गटाला परवानगी … Read more

Published On: 

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा शिवाजी पार्क येथे मेळावा होतो. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेणार? यावरून वाद निर्माण झाला होता.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटाने दीड महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, महापालिकेने अद्याप कोणत्याही गटाला परवानगी दिली नव्हती.

अशात शिंदे गटानं शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. यानंतर आता शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेण्याचा ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Shivaji Park and Dussehra Melava are our tradition – Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. यावर्षी देखील ही आपली परंपरा कायम राहिली आहे.

यावर्षी देखील आपल्या शिवसेनेचा मेळावा वाजत गाजत शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर होणार आहे. तुम्ही सगळे तिकडे आला तर आम्हाला आनंद होईल.”

दरम्यान, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी केलेला अर्ज शिंदे गटानं मागे घेतला आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.

ट्विट करत ते म्हणाले, “दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण ! शिवसैनिकांसाठी हा महोत्सवच असतो. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली ५० वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंड पणे देत आले.

यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा व हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून शिवसेना नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचे जाहीर करून सामंजस्याची भूमिका घेतली.

त्याबद्दल त्यांचे शिवसैनिक व हिंदुजनतेच्या वतीने जाहीर आभार ! तसेच आपल्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, दसरा मेळाव्यासाठीचा अर्ज मागे घेत आहोत !”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही