Shubman Gill | टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी! शुभमन गिलला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

Shubman Gill | टीम महाराष्ट्र देशा: 5 ऑक्टोबर 2023 पासून आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता.

सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिल याची तब्येत बिघडली आहे. त्यानंतर त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

गिल रुग्णालयात दाखल झाल्यामुळे टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली. अशात आता टीम इंडियासाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

Shubman Gill was hospitalized

शुभमन गिलच्या (Shubman Gill) प्लेटलेट्स अचानक कमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यापूर्वी त्याला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना खेळता आला. त्याचबरोबर तो अफगाणिस्तान विरुद्ध होणारा सामना देखील खेळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघ तिसरा सामना खेळणार आहे. त्या सामन्यामध्ये गिल खेळणार की नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, शुभमन गिलला (Shubman Gill) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असला तरी बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.

त्याच्या प्लेटलेट्सचे प्रमाण अत्यंत कमी झाले होते. त्यामुळे तो कोणत्या सामन्याआधी तंदुरुस्त होईल, हे अद्याप सांगता येणार नसल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. शुभमन गिलची ही स्थिती टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.