Share

Sanjay Shirsat | संजय राऊत एक दिवस पूर्ण ठाकरे गटाला जेलमध्ये पाठवणार – संजय शिरसाट

🕒 1 min readSanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी भाजप सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपची राजकीय रणनीती असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जो उठाव केला, तो … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी भाजप सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपची राजकीय रणनीती असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जो उठाव केला, तो भारतीय जनता पक्षामुळे केलेला नाही.

भाजपने आमचा पक्ष फोडलेला नाही. आमच्या अंतर्गत वादामुळे आम्ही हा उठाव केला आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

BJP has not broken our party – Sanjay Shirsat

प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “आम्ही जो उठाव केला तो भारतीय जनता पक्षामुळे केलेला नाही.

भाजपने आमचा पक्ष फोडलेला नाही. आमच्या अंतर्गत वादामुळे आम्ही हा उठाव केला आहे. मात्र, आजही आमचं दैवत शिवसेनाप्रमुखच आहे. आम्ही शिवसेनाप्रमुखांना मानणारे लोक आहोत.

आम्ही दलाल लोकांना मानत नाही. यासाठी लाखो लोक आज आम्हाला धन्यवाद देत आहे. एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांचं स्वागत जल्लोषात होतं. शिवसैनिक म्हणून लोक आमच्याकडे बघत असतात.

संजय राऊत यांच्या बडबडीमुळे एक दिवस ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे. ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ करण्यासाठी संजय राऊत यांनी सुपारी घेतली आहे. संजय राऊत एक दिवस पूर्ण ठाकरे गटाला जेलमध्ये पाठवणार आहे.”

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपवर खोचक शब्दात टीका केली आहे. “फोडा आणि राज्य करा ही भाजपची राजकीय रणनीती आहे. भाजप घर आणि पक्ष फोडत आहे.

शिवसेनेनंतर त्यांनी राष्ट्रवादी देखील फोडली. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपने आमची कितीही पक्ष फोडले तरी मूळ विचार आमच्याकडेच राहणार आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!