PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते.

हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 14 हप्ते मिळाले आहे. तर पंधराव्या हप्त्यासाठी सरकारने नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

The government has started the registration process for the fifteenth installment

प्रधानमंत्री किसान योजनेच्या (PM Kisan Yojna) पंधराव्या हप्त्यासाठी सरकारने नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शेतकरी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करू शकतात.

या योजनेतील पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर तुम्ही ते लवकरात लवकर करून घ्यावे.

शेतकरी जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in) जाऊन ई-केवायसी करू शकतात.

ई-केवायसी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना अर्ज भरताना काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. जसं की, अर्ज भरत असताना शेतकऱ्यांना लिंग, नाव, आधार क्रमांक, पत्ता इत्यादी गोष्टी अचूक रित्या भराव्या लागणार आहे.

या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळली तर शेतकऱ्यांना या योजनेतील पंधराव्या हप्त्यापासून (PM Kisan Yojna) वंचित राहावे लागू शकते.

पीएम किसान योजनेसंबंधी (PM Kisan Yojna) अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर फोन करू शकतात. त्याचबरोबर pmkisan-ict@gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.