Jitendra Awhad | सनातन आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार (Sharad Pawar) आणि जितेंद्र आव्हाड सनातन विरोधी आहे असं भारतीय जनता पक्षांना म्हटलं होतं. भाजपच्या या टीकेला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सनातन आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

We have been fighting against Sanatan since 2003-04 – Jitendra Awhad

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “सनातन धर्मामुळे देशातील स्त्रियांना अधिकार मिळालेले नाही. त्याचबरोबर या धर्मामुळे देशात जातिवाद निर्माण झाला आहे. सनातन हा धर्म नाही.

गेल्या सहा महिन्यापासून हा धर्म शोधून आणला आहे. 2003-04 पासून आम्ही सनातन विरोधात लढत आहोत. हिंदू धर्म हा सर्वांना आपलं मानणारा आहे. या धर्मामध्ये जो अत्याचार झाला आहे तो सनातन लोकांनी केला आहे.

सनातन लोकांनी महावीर जैन, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांना छळल आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना लोकांनी सनातन लोकांमुळेच मारलं आहे.

त्याचबरोबर शाहू महाराज आणि महात्मा गांधी यांची आत्महत्या देखील सनातन लोकांनी केली आहे. सनातन आणि हिंदू धर्माचा तसा काहीच संबंध नाही.”

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्हावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी बोलत असताना जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी या प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाकडून आमच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहे. आम्हाला थोडासा न्याय मिळाल्यासारखा दिसत आहे.

शिवसेना आणि आमच्या याचिकेवर 13 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. न्याय प्रक्रियेला गती आलेली असून योग्य तो न्याय मिळेल, असं मला वाटत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.