Nitesh Rane | खिचडी चोरण्याएवढी संजय राऊतांची लायकी – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्द टीका केली आहे. सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची लायकी काढली आहे.

फडणवीसांची कपॅसिटी आहे व ती कपॅसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंदे गटाने ठरवले आहे खरे, पण या कपॅसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये?

कपॅसिटी असताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले व कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे बरे नाही. फडणवीसांची गरज दिल्लीत आहे, असे शिंदे गट म्हणतोय.

मणिपूरपासून कश्मीरपर्यंत बरेच प्रश्न आहेत, चिनी सैन्यही देशाच्या सीमा भागांत घुसले आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याची फडणवीसांची कपॅसिटी आहेच.

मोदी-शहा पूर्ण अपयशी ठरले आहेत. फक्त फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची कपॅसिटी शिंदे-मिंधे गटात आहे काय?, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

ठाकरे गटाच्या या टीकेला भाजप नेते नितेश राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खिचडी चोरण्याएवढी संजय राऊत यांची लायकी आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut does not deserve to be a Gram Sevak – Nitesh Rane

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “संजय राजाराम राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या लायकीबद्दल आजच्या सामना अग्रलेखात लिहिलं आहे.

रश्मी ठाकरे यांना सामनाचं संपादक बनवून संजय राजाराम राऊत यांची त्यांनी लायकी काढली आहे, असं आम्ही म्हणायचं का? संजय राऊत यांची साधी ग्रामसेवक बनायची लायकी नाही.

संजय राऊत 2019 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघत होते. शरद पवार माझं नाव पुढे घेतील, यासाठी ते आमदारांना फोन करत होते. मात्र, दोन ते तीन आमदार यांच्या बैठकीला आलेच नव्हते, हीच आहे का संजय राऊत यांची लायकी?”

पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “संजय राऊत यांनी आधी स्वतःच्या लायकीबद्दल बोलायला हवं. राजाराम राऊत यांच्या परिवारामध्ये भरपूर कॅपॅसिटी आहे. मात्र, त्यांची कॅपॅसिटी खिचडी चोरण्यामध्ये आहे.

गरीब कामगारांच्या खिचडी चोर प्रकरणांमध्ये संजय राऊत यांच्या कुटुंबातील लोकांची नावं होती. ही कपॅसिटी आणखीन कोणाच्याही कुटुंबामध्ये नाही. ही कपॅसिटी फक्त राजाराम राऊत यांच्या कुटुंबामध्ये आहे आणि यासाठी आपण त्यांचा सन्मान करायला हवा.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.