Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.
या प्रकरणावर निवडणूक आयोग सुनावणी घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक शब्दात टीका केली आहे.
फोडा-झोडा व राज्य करा, ही भाजप राजकीय रणनीती असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Bharatiya Janata Party is breaking the house and the party – Sanjay Raut
आज सकाळी प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “फोडा-झोडा व राज्य करा, ही भाजप राजकीय रणनीती आहे. भारतीय जनता पक्ष घर आणि पक्ष फोडत आहे. शिवसेनेनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला.
त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्ष फोडण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, अखिलेश यादव आणि शिवपाल यादव पुन्हा एकदा एकत्र आले आहे. त्यांनी आमचे कितीही पक्ष फोडले तरी मूळ विचार हा आमच्याकडेच आहे.
आजही शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालीच आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, असं म्हटल्यावर लोक हसतात. असं म्हटल्यावर लोक त्यांना वेड्यात काढतात.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करणारे शरद पवार (Sharad Pawar) अजून हयात आहे.
शरद पवार हयात असताना यांनी राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावर दावा ठोकला आहे. या मुद्द्यावर सुनावणी घेत असताना निवडणूक आयोगाला देखील काहीतरी वाटलं पाहिजे.
पक्षाचे संस्थापक शरद पवार समोर बसलेले असताना दुसरे कोणीतरी पक्षावर दावा ठोकत आहे. हा सर्व प्रकार भारतीय जनता पक्षामुळे घडत आहे. हे सर्व प्रकार देशाची लोकशाही खड्ड्यात घालणार आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लढाई आता सुप्रीम कोर्टात; शरद पवारांसह अजित पवारांनीही दाखल केली याचिका
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीस अपमानाचा घोट गिळून महाराष्ट्राच्या दुय्यम स्थानी बसलेय; ठाकरे गटाचं टीकास्त्र
- Weather Update | राज्यात परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ, हवामान विभागाने दिला अंदाज
- Chhagan Bhujbal | अजित पवार मुख्यमंत्री कसे होणार? छगन भुजबळ म्हणतात…
- Jitendra Awhad | नवाब मलिक अजित पवार गटात जाणार? जितेंद्र आव्हाड म्हणतात…