Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीस अपमानाचा घोट गिळून महाराष्ट्राच्या दुय्यम स्थानी बसलेय; ठाकरे गटाचं टीकास्त्र

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केंद्रात जाऊन नेतृत्व करण्याचा सल्ला दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. फडणवीसांची कपॅसिटी आहे व ती कपॅसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंदे गटाने ठरवले आहे खरे, पण या कपॅसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये?

कपॅसिटी असताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले व कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे बरे नाही. फडणवीसांची गरज दिल्लीत आहे, असे शिंदे गट म्हणतोय.

मणिपूरपासून कश्मीरपर्यंत बरेच प्रश्न आहेत, चिनी सैन्यही देशाच्या सीमा भागांत घुसले आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याची फडणवीसांची कपॅसिटी आहेच.

मोदी-शहा पूर्ण अपयशी ठरले आहेत. फक्त फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची कपॅसिटी शिंदे-मिंधे गटात आहे काय?, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहू नये, त्यांनी केंद्रात जावे, अशा सूचना सरकारातील शिंदे गटाने केल्या आहेत. शिंद मुख्यमंत्री राहावेत, असे या गटाचे म्हणणे आहे.

दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे की, फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

त्याच वेळी अजितदादा गटाचे धर्मराव बाबा अत्राम यांनी घोषणा केली की, “अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होत आहेत.” छगन भुजबळ यांनीही अजितदादा मुख्यमंत्री होतील यास दुजोरा दिला आहे.

एकंदरीत महाराष्ट्रात याक्षणी तीन-तीन मुख्यमंत्री घोड्यावर बसले आहेत, पण घोडा काही पुढे सरकायला तयार नाही. शिंदे गटाचे शिरसाट यांनी फडणवीसांवर केंद्रीय नेतृत्वाची धुरा परस्पर सोपवल्याने फडणवीसांचे अंग वाढले व त्यांच्या जॅकेटाची शिलाई ढिली पडली.

फडणवीस केंद्रात जाणार म्हणजे काय करणार? आताच फडणवीस हे मनाने केंद्रात गेल्यासारखे बोलू लागले आहेत. शनिवारी त्यांनी मुंबईत जाहीर केले की, “2030 पर्यंत भारत देश तिसरी आर्थिक महासत्ता होईल.

” जॅकेटची शिलाई उसवल्याचे हे लक्षण आहे. इकडे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ढासळत आहे. अर्थमंत्री अजित पवारांवर शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून मारले व निषेध केला.

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचे बजेट कोलमडले आहे आणि फडणवीस 2030 साली देशाला तिसरी आर्थिक महासत्ता करायला निघाले आहेत. राज्यातल्या बेशिस्तीची ही कहाणी आहे.

अजितदादा मुख्यमंत्री होतील, शिंदे आजन्म मुख्यमंत्री राहतील व फडणवीस लवकरच केंद्रात जातील यातील नक्की काय घडणार, हे प्रभू श्रीरामालाच माहित. शिंद गटाचे प्रवक्ते शिरसाट यांनी सांगितले, “फडणवीस यांचे काम उत्कृष्ट आहे, त्यांनी केंद्रात जावे.”

फडणवीसांवर ही काय वेळ आली आहे? महाराष्ट्रातील यत्किंचित लोक त्यांना केंद्रात जाऊन काम करण्याचा सल्ला देत आहेत. फडणवीसांची लायकीच या प्रकरणात निघाली.

शिंद हे अलीकडे वारंवार रात्री-अपरात्री दिल्लीत जातात ते फडणवीस यांना केंद्रात स्थान मिळावे यासाठीच की काय? फडणवीस हे अपमानाचा घोट गिळून महाराष्ट्रात दुय्यम स्थानी बसले आहेत. दोन-दोन उपवस्त्र दिल्लीने त्यांच्या उरावर बसविली आहेत.

महाराष्ट्राची चारही बाजूंनी लूट सुरू आहे व फडणवीस हतबलतेने हे सर्व सहन करीत आहेत. गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाची उरलीसुरली पत रसातळाला पोहोचली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे खल्लास झाली आहे. विफलता व निराशा फडणवीसांच्या चेहऱ्यावर, वागण्या-बोलण्यात स्पष्ट दिसते. हे वातावरण असे आहे की, नागपुरात लोकसभा आणि विधानसभेत भारतीय जनता पक्ष पराभवाच्या छायेत स्पष्ट दिसतो आहे.

लोकांच्या मनात संतापाचा लाव्हा उसळत आहे. शिंदे पवार प्रकरणात भाजपची पुरती ‘फजीहत’ झाली असून फडणवीस यांच्या नेतृत्वाची चमक साफ उतरली आहे. त्यामुळे त्यांना केंद्रात तरी स्थान मिळेल काय? हा प्रश्नच आहे.

फडणवीस चांगले काम करतात असा शिंदे गटाचा दावा आहे, पण दिल्लीत व केंद्रीय मंत्रिमंडळात आता कर्तबगार लोकांना स्थान राहिलेले नाही. सगळ्यांचेच टायर पंक्चर करून खुर्च्यावर बसवले जात आहे.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांत भाजपचा दारुण पराभव हा ठरलेला आहे. त्यामुळे फडणवीस दिल्लीत जाण्याची शक्यता अजिबात नाही. कर्तबगार माणसांचे पंख छाटायचे, गरुडांच्या चिमण्या करायच्या असे दिल्लीचे आजचे धोरण आहे.

देशाला संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, कायदामंत्री वगैरे महत्त्वाच्या पदांवर लोक आहेत की नाहीत? हा प्रश्न पडला आहे. देशाची राजधानी आता दिल्ली राहिलेली नसून गुजरातचे महत्त्व वाढवले जात आहे.

त्यामुळे फडणवीस, शिंद, अजित पवारांना यापुढे सुरत अहमदाबादचेच हेलपाटे घालावे लागतील. 2024 नंतर दिल्ली आणि महाराष्ट्रात उलथापालथी होऊन दोन्हीकडील राज्यशकटे बदललेली असतील.

अशा वेळी शिंदे काय व अजित पवार काय, हे सर्वच बाबतीत बिनकामाचे ठरतील याविषयी आमच्या मनात शंका नाही. फडणवीसांची कपॅसिटी आहे व ती कपॅसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंद गटाने ठरवले आहे खरे, पण या कपॅसिटीचा शोध मोदी शहांना का लागू नये?

कपॅसिटी असताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले व कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे बरे नाही. फडणवीसांची गरज दिल्लीत आहे, असे शिंद गट म्हणतोय.

गाझापट्टीत युद्ध भडकले आहे. जग तिसरया महायुद्धाच्या उंबरठयावर आहे. युद्धाचा हा भडका विझवायचा असेल तर नागपूरचे सोमेश्वरी बंब घेऊन फडणवीसांना दिल्लीत पाठवावे लागेल.

मणिपूरपासून कश्मीरपर्यंत बरेच प्रश्न आहेत, चिनी सैन्यही देशाच्या सीमा भागात घुसले आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याची फडणवीसांची कपॅसिटी आहेच. मोदी-शहा पूर्ण अपयशी ठरले आहेत. फक्त फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची कपॅसिटी शिंदे-मिंधे गटात आहे काय?

सौजन्य – सामना

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.