Weather Update | राज्यात परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ, हवामान विभागाने दिला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये आज आणि उद्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यासह देशामध्ये देखील परतीचा पाऊस हजेरी लावणार आहे.

रविवारपर्यंत देशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.

Southwest Monsoon winds have started to withdraw from the state

राज्यातून नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरण्यास सुरू झाली आहे. परिणामी राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (06 ऑक्टोबर) हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

पुणे, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी तापमान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Update) वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, आज मुंबई आणि उपनगरातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Update) वर्तवण्यात आली आहे.

तर या परिसरातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावं, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.