Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लढाई आता सुप्रीम कोर्टात; शरद पवारांसह अजित पवारांनीही दाखल केली याचिका

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. 02 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.

त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट दोघांनीही राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावर दावा ठोकला.

Ajit Pawar group has filed a caveat in the Supreme Court

अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. याबद्दल निवडणूक आयोगाने शुक्रवारी पहिली सुनावणी घेतली.

या सुनावणीनंतर आज (9 ऑक्टोबर) रोजी पुन्हा एकदा निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या आधी शरद पवारांनी मोठी खेळी खेळली आहे. राष्ट्रवादीच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

शरद पवारानंतर अजित पवार गटानेही सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केली आहे. आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती अजित पवार गटाने न्यायालयाला केली आहे.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी, अशी याचिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

मात्र, त्या आधीच अजित पवार गटाने ‘कॅव्हेट’ दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीची कायदेशीर लढाई आता सर्वोच्च न्यायालयात देखील सुरू होणार आहे. राष्ट्रवादीच्या या लढाईत कोण जिंकणार? याकडे आता संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.