Supriya Sule | भाजपच्या शासनकाळात राज्यातील सामान्य माणूस असुरक्षित – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हेरंब कुलकर्णी शाळेतून घरी जात असताना अज्ञातांनी लोखंडी रॉडने त्यांच्यावर मारहाण केली.

या प्रकरणाला 48 तास उलटून गेले असले तरी राज्य सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा ठोस पाऊल उचलण्यात आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे.

भाजपच्या शासनकाळात राज्यातील सामान्य माणूस असुरक्षित आहे. महाराष्ट्र गुंडांसाठी जणू नंदनवन झाले आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

Heramb Kulkarni was fatally attacked – Supriya Sule

ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “भाजपच्या शासनकाळात राज्यातील सामान्य माणूस असुरक्षित आहे. महाराष्ट्र गुंडांसाठी जणू नंदनवन झाले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

हि घटना अतिशय संतापजनक आहे. समतेच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली.‌ हे अतिशय चिंताजनक आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे. त्यांचे गृहखात्याकडील अक्षम्य दुर्लक्ष सामान्यांच्या जीवावर बेतत आहे.

सीसीटीव्हीत हल्लेखोर दिसत असतानाही आतापर्यंत त्यांच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. या गुंडाना कोण अभय देतेय याचीही कसून चौकशी होण्याची गरज आहे. या घटनेतील हल्लेखोरांना तातडीने गजाआड करा. या हल्ल्याचा तीव्र निषेध!”

दरम्यान, या सर्व प्रकरणाबाबत हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. प्रतिमा कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

“मी प्रतिमा कुलकर्णी, हेरंब कुलकर्णी यांची पत्नी आहे. माझे पती हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.

आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली.

गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला ४ टाके पडले आहेत. डोक्यावर चा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता.

ते रस्त्यावर पडले. त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण ४८ तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही.

त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे.सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे.

आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे…सर आता झोपून आहेत पण तब्येत ठीक आहे”, असं प्रतिमा  कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.