PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! होळीच्या आधी ‘या’ तारखेला मिळू शकतो 13 वा हप्ता

PM Kisan Yojana – प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. शेतकरी गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. तेराव्या हप्त्यासाठी सरकारने कडक नियम जारी केले आहे. कारण या योजनेतील बारावा हप्ता मिळवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनवटी कागदपत्रांची मदत घेतली होती. त्यामुळे तेरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि ई-केवायसी करून घेणे अनिवार्य केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रधानमंत्री किसान योजनेतील (PM Kisan Yojana) तेरावा हप्ता होळीच्या आधी शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या योजनेतील बारावा हप्ता 17 ऑक्टोबर 2022 रोजी जारी करण्यात आला होता. त्यानंतर तेराव्या हप्त्यासाठी डिसेंबर ते मार्च कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे होळीपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेतील तेरावा हप्ता मिळेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

PM Kisan Yojana 13th installment available

दरम्यान, ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी न केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या योजनेतील (PM Kisan Yojana) 12 व्या हप्त्यापासून वंचित रहावे लागले होते. त्या शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्यांमध्येच बाराव्या हप्त्याची रक्कम दिली जाणार आहे. म्हणजेच या शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याची 2000 आणि 12 व्या हप्त्याची 2000 अशी मिळून 4000 रुपये रक्कम येणार आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणार आहे.

केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Sanman Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवले जातात. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे.

पीएम किसान योजना हेल्पलाइन नंबर (PM Kisan Yojana Helpline No)

शेतकरी आपल्या समस्या नोंदवण्यासाठी हेल्पलाइन नंबर क्रमांक 155261 किंवा टोल फ्री क्रमांक 1800-115-526 आणि 011-23381092 या नंबरवर कॉल करू शकतात. या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची समस्या नोंदवू शकतात किंवा पीएम किसान योजनेच्या संबंधित प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीद्वारे देखील आपली समस्या नोंदवू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.