Dhananjay Munde | रस्त्यांची किंमत वाढणार असेल तर वाढवलेला टोल योग्य – धनंजय मुंडे

Dhananjay Munde | टीम महाराष्ट्र देशा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टोलाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही चार चाकी आणि छोट्या गाड्यांना मुक्ती दिली आहे. राज्यातील टोलवर आम्ही फक्त कमर्शियल आणि मोठ्या गाड्यांचे टोल घेतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली होती. महाराष्ट्रातील टोल हा सर्वात मोठा स्कॅम आहे.

सगळ्या सरकारने याबाबत फक्त थापा मारल्या आहेत. टोलाचा पैसा कुठे जातो? असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. अशात आता या प्रकरणावर अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Everyone needs good roads – Dhananjay Munde

धनंजय मुंडे म्हणाले, “रस्त्यांची किंमत वाढणार असेल तर वाढलेला टोल योग्य आहे. सर्वांना चांगले रस्ते पाहिजे. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेऊ नये. जर कुणाला आंदोलन करायचं असेल तर लोकशाही पद्धतीने त्यांनी त्यांचं आंदोलन करावं.”

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर मनसेने देखील प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की राज्यात दुचाकी, तीन चाकी आणि किंवा चारचाकी वाहनांना टोल माफ आहेत. मग आजपर्यंत टोलच्या नावाखाली जमा होणारी रक्कम कुठे जमा होत आहे?

एकतर राज्य सरकार खोटं बोलत आहेत किंवा टोल कंपन्या लूट करत आहेत. मी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि त्यांना सांगणार आहे की देवेंद्र फडणवीस म्हणालेत तसं दुचाकी तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना टोल माफ करा, आणि इतके दिवस जे पैसे गोळा झालेत तर ते कुठे गेले?

आणि इतकं होऊन पण जर टोल वसूल केला जाणार असेल तर माझे महाराष्ट्र सैनिक टोल नाक्यांवर उभे राहून वाहनांना सोडायला लावेल. आणि तरीही जर संघर्ष झाला तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. मग जे होईल ते होईल”, असं मनसेनं ट्विट करत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.