Chitra Wagh | महायुतीचं सरकार फेसबुकवरचं नाही; चित्रा वाघांनी ठाकरे गटाला डिवचलं

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: काही दिवसांपूर्वी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं होतं. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी आज नांदेड येथील शासकीय रुग्णालयाला भेट दिली आहे.

त्यानंतर त्यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. आमचं महायुतीचं सरकार फेसबुक वरचं नाही असं म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाला डीवचलं आहे.

The government belongs to the common people – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “आज नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट देऊन घडलेल्या घटनेबाबतची माहिती घेतली. तसंच इथल्या परिस्थितीची पाहणी केली., रुग्ण नातेवाईकांशीही बोलले.

खरंतर गेले काही दिवस विरोधक या घटनेवरून जो सूर आळवताहेत. त्यांना मला हे सांगायचंय जे इथे येऊन मोठमोठ्या बाता करून गेले ते किंवा अगदी मी ही डॉक्टर नाही पण मागच्या तीन वर्षाचे हॉस्पिटलचा स्टॅटीस्टीक्स चा रिपोर्ट पहा 2020 ते 2023 पर्यंत दरदिवशी १३ असा मृत्यूदर यात दिलेला आहे.

त्यामुळे हे एकाच दिवशी घडलेलं नाही खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेले पेशंट अत्यवस्थ परिस्थितीत इथे आणले जातात इथले डॉक्टर ही शर्थीचे प्रयत्न करतात वाचवण्याचे.

ज्या दिवशी 24 मृत्यू झाले त्यातले 17 अत्यवस्थ परिस्थितीत आणले गेलेले होते शिवाय त्याच दिवशी 230 रूग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेलेत.

सरकार आपल आहे सर्वसामान्य जनतेचे आहे त्यामुळे राज्यात एकही मृत्यू झाला तरी सरकार म्हणून ती जबाबदारी आहेचं पुर्ण जबाबदारी घेतं राज्यसरकार काम करत आहे राज्यात एक ही मृत्यू होणं ही सरकारसाठी देखील ही दुःखाचीच गोष्ट आहे.

पण या घटनेचं राजकारण करून विरोधकांनी स्वतःच मानसिक आजारपण महाराष्ट्रातील जनतेला दाखवलं, त्याची मला कीव येते. विरोधकांना महाराष्ट्रातील जनतेच्या दु:ख वेदना यांच्याशी काही घेणदेणं नाहीये.

नांदेडमध्ये येऊन लोकांच्या दु:खाचा बाजार मांडून स्वत:साठी राजकीय सलाईन हवं होतं, तेच त्यांनी इथं येऊन नेलं त्याचा धिक्कार आहे आणि त्यात राज्याच्या मोठ्ठ्या ताईंचा मोठा सहभाग होता हे अत्यंत दुदैवी आहे आणि संपूर्ण राज्यात वणवा पेटवल्यासारखा राज्यातील जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम करत आहेत.

महायुतीचं हे सरकार फेसबुकवरचं सरकार नाही इथे आरोग्यव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य आहे या घटनेसंदर्भात एका दिवसात १४ निर्णय घेतले गेले. डीपीडीसीचे फंड दिले गेले.

त्याच बरोबरीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन, हॉस्पिटलचे डीन यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलीय. यांच्या माध्यमातून केवळ याच नाही, तर राज्याभरातील सर्व शासकीय हॉस्पिटल्समध्ये जे काही त्रुटी असतील, त्यांचा आढावा घेण्याचं काम सुरू झालंय. कारण हे आपलं ॲक्शन मोडमधलं सरकार आहे.

त्यामुळे माझी या जनतेला विनंती आहे, त्यांनी विरोधकांच्या संभ्रमी, भयभीत करणाऱ्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नये. हे सरकार तुमचं आहे… तुमची गैरसोय होणार नाही, यासाठी कायम कटीबद्ध आहे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe