Ajit Pawar | महायुतीत सामील झाल्यानंतर अजित पवारांचं राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पत्र, वाचा सविस्तर

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी अजित पवार राष्ट्रवादीत बंडखोरीकर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे.

आज (10 ऑक्टोबर) अजित पवारांना महायुती सरकारमध्ये सामील होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने अजित पवारांनी आज पत्राद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.

Ajit Pawar completed 100 days of joining the mahayuti government

महायुती सरकारमध्ये सामील होऊन अजित पवारांना (Ajit Pawar) आज 100 दिवस पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने त्यांनी पत्राच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे.

या पत्रामध्ये अजित पवार यांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करण्यात आला आहे. या पत्रात अजित पवार म्हणतात, “अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष, मी आणि माझ्या सर्व सहकान्यांच्या कामातून तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुम्हा सर्वांना शब्द आहे. राजकारणाच्या पलीकडे भूक, वेरोजगारी, महागाई या प्रश्नावर राज्य सरकारला काम करावे लागते.

त्यासोबतच रोजगार, सर्व समाजघटकांचे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अमलबजावणी हे राज्य सरकारच उद्दिष्ट असते.

येत्या काळात या सर्व विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत तसेच राज्य सरकारमधील सत्तेच्या माध्यमातून आम्ही हे काम अधिक जोमाने करणार आहोत.

टीका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे. असे मी मानतो आणि सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेतो. मात्र केवळ राजकारणासाठी राजकीय टीका हा माझा प्रांत नाही.

मी सकारात्मक. विकासात्मक राजकारणावर विश्वास असणारा राजकीय कार्यकर्ता आहे. हाती घेतलेले कुठलेही काम मार्गी लावणे, त्या कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड आहे. यावर माझा विश्वास आहे.

नव्या सरकारमध्ये सामील होत असताना मी वर मांडलेली भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. आम्ही याच मार्गावर गेले शंभर दिवस वाटचाल केली आहे आणि यापुढेही करीत राहू हा विश्वास मी आज या पत्राच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना देऊ इच्छितो, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि साथ अशीच गावत राहू दे, ही आशा व्यक्त करतो. तूर्तास इतकेच. यापुढेही तुमच्याशी हा पत्रसंवाद कायम राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe