Share

Uddhav Thackeray | दसऱ्याला शिवाजी पार्कला होणार ठाकरे गटाचा मेळावा, मग शिंदे कुठे घेणार सभा?

🕒 1 min read Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: शिवाजी पार्क येथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेणार यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला होता. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाने दीड महिन्यापूर्वी महानगरपालिकेकडे परवानगी अर्ज केला होता. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: शिवाजी पार्क येथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेणार यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला होता.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाने दीड महिन्यापूर्वी महानगरपालिकेकडे परवानगी अर्ज केला होता. मात्र, महानगरपालिकेने अजून कुठल्याही गटाला परवानगी दिलेली नाही. अशात याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी शिंदे गटानं केलेला अर्ज मागे घेतला आहे.

Dussehra Melava will be held at other places

शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. सदा सरवणकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

ट्विट करत ते म्हणाले, “दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण ! शिवसैनिकांसाठी हा महोत्सवच असतो. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली ५० वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंड पणे देत आले.

यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा व हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून शिवसेना नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचे जाहीर करून सामंजस्याची भूमिका घेतली.

त्याबद्दल त्यांचे शिवसैनिक व हिंदुजनतेच्या वतीने जाहीर आभार ! तसेच आपल्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, दसरा मेळाव्यासाठीचा अर्ज मागे घेत आहोत !

“दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान आम्हाला हिंदुत्ववादी विचारांसाठी मिळावं, अशी आमची भूमिका होती. मात्र, वाद टाळण्यासाठी आम्ही आझाद मैदान किंवा क्रांती मैदानावर आमचा मेळावा घेणार आहोत, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे”, असही सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही