🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई: शिवसेनेच्या वतीने दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क येथे दसऱ्याला मेळावा घेतला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटामध्ये यावरून वाद निर्माण झाला होता.
अशात यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुंबई महानगरपालिकेला दोन महिन्यापूर्वी अर्ज केला होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयापूर्वी शिंदे गटानं हा अर्ज मागे घेतला आहे.
त्यामुळे आता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dussehra Melava is a celebration – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “आमचा शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा होऊ नये, यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. बेइमान लोकांच्या माध्यमातून त्यांनी हे प्रयत्न केले आहे.
परंतु, शिवसेना देखील आग आहे. कुणीही आमच्या मार्गामध्ये कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी सर्व अडथळे पार करून आम्ही दरवर्षी शिवतीर्थावर मेळावा घेतला आहे. दसरा मेळावा हा एक उत्सव आहे आणि आमचा हा उत्सव कुणीही थांबू शकत नाही.”
दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी केलेला अर्ज शिंदे गटानं मागे घेतला आहे. याबद्दल शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी माहिती दिली आहे.
“दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण ! शिवसैनिकांसाठी हा महोत्सवच असतो. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली ५० वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंड पणे देत आले.
यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा व हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून शिवसेना नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचे जाहीर करून सामंजस्याची भूमिका घेतली.
त्याबद्दल त्यांचे शिवसैनिक व हिंदुजनतेच्या वतीने जाहीर आभार ! तसेच आपल्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, दसरा मेळाव्यासाठीचा अर्ज मागे घेत आहोत”, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- UPSC Recruitment | UPSC मार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Uddhav Thackeray | शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा कायम – उद्धव ठाकरे
- Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – मनोज जरांगे
- Eknath Shinde | शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे 6 मोठे निर्णय, जाणून घ्या सविस्तर
- Uddhav Thackeray | दसऱ्याला शिवाजी पार्कला होणार ठाकरे गटाचा मेळावा, मग शिंदे कुठे घेणार सभा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











