PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 15 ऑक्टोबरपूर्वी करा ‘ही’ काम

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते.

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते.

दोन हजार रुपयाच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये सरकार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 14 हप्ते मिळाले आहे. यानंतर आता शेतकरी या योजनेतील पंधराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे.

Linking of e-KYC, land verification and Aadhaar card is essential for farmers

प्रधानमंत्री किसान योजनेतील (PM Kisan Yojana) पंधराव्या हप्त्याची शेतकरी वाट बघत आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, जमिनीची पडताळणी आणि आधार कार्ड लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे.

या योजनेतील पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी संबंधित गोष्टी शेतकऱ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून घ्याव्या लागतील. या गोष्टी जर अपूर्ण राहिल्या तर शेतकऱ्यांना या योजनेतील पंधराव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.

या योजनेतील पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर तुम्ही ते लवकरात लवकर करून घ्यावे.

शेतकरी जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in) जाऊन ई-केवायसी करू शकतात.

दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेत तब्बल अडीच कोटी बोगस शेतकरी आढळून आले आहे.

2021 -22 मध्ये 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांचा आढावा घेतला असता ही संख्या 8 कोटी 51 लाख आढळून आली आहे. या योजनेत अडीच कोटी लाभार्थी बनावटी आढळून आले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.