Sanjay Raut | हिम्मत असेल तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा – संजय राऊत

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Sanjay Raut | मुंबई: दादर येथील शिवाजी पार्क येथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा भव्य मेळावा पार पडतो. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये यावरून वाद निर्माण झाला होता.

अशात यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाने मुंबई महानगरपालिकेकडे परवानगी अर्ज केला होता. शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयापूर्वीच त्यांचा हा अर्ज मागे घेतला आहे.

यानंतर शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाचा मार्ग खुला झाला आहे. या सर्व घटनेवर प्रतिक्रिया देत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांवर (Ajit Pawar) खोचक शब्दात टीका केली आहे.

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “दसरा मेळावा हा शिवसेनेच्या विचारांचा अंगार घेऊन होत असतो.

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सुद्धा दसरा मेळाव्याला देशात एक वेगळं स्थान मिळालं आहे. आता अंगार कोण आणि भंगार कोण? हे येणारा काळ ठरवणार.

तुमचे विचार ऐकायला लोक येणार असतील, तर येऊ द्या. आम्ही तुमच्या विचारांना अंगार भंगार म्हणणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला भंगार म्हणण्याइतपत तुमची जीभ खाली घसरली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार स्वतंत्र होता आणि तोच शिवसेनेचा विचार होता.”

Eknath Shinde is putting up a welcome banner for JP Nadda – Sanjay Raut

पुढे बोलताना ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती केली. या युतीदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे विचार कोणत्याही दुसऱ्या पक्षात विलीन केले नाही.

आज एकनाथ शिंदे जेपी नड्डा यांच्या स्वागताचे बॅनर लावत आहे. ही त्यांच्यावर वेळ आली आहे आणि ते लोकांना विचार देण्याच्या गोष्टी करत आहेत. गद्दार आणि बेईमानी हा काही अंगार नाही, हे भंगार आहे.

तुमच्यात जर हिम्मत असेल तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करावा. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून लोकांसमोर जाऊन मत मागावी. त्यानंतर आपण अंगार कोण आणि भंगार कोण? याबाबत बोलू.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe