IND vs AFG | भारत अफगाणिस्तान सामन्यातून अश्विन बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

IND vs AFG | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ला 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मधून रविश्‍चंद्रन अश्विन (Ravishchandran Ashwin) ला वगळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

Ravichandran Ashwin may be dropped for IND vs AFG match

टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये रविचंद्र अश्विनचा समावेश होता.

अशात आता अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG)  होणाऱ्या सामन्यासाठी रविचंद्र अश्विनला वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी मोहम्मद शमीचा संघात समावेश केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

कारण 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये शमीने अफगाणिस्तान विरुद्ध घातक गोलंदाजी करत हॅट्रिक घेतली होती. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या तूफान फॉर्ममध्ये असलेला टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे तो अफगाणिस्तान (IND vs AFG) विरुद्ध सामना खेळू शकत नाही.

प्लेटलेट्स अचानक कमी झाल्यामुळे शुभमन गिलला काल (10 ऑक्टोबर) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

गिलच्या प्लेटलेट्सचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे तो कोणत्या सामन्याआधी तंदुरुस्त होईल, हे अद्याप सांगता येणार नसल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.

त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe