🕒 1 min read
क्रिकेटच्या मैदानात कधी कोणता संघ बाजी मारेल सांगता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. रविवारी (८ मार्च) टी-२० वर्ल्ड कपची महाअंतिम लढत (IND vs NZ T20 World Cup 2026 Final) रंगणार आहे. पण या फायनलआधीच एका ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केलेला मोठा दावा भारतीय चाहत्यांची झोप उडवणारा आहे. घरच्या मैदानावर टीम इंडियाला हरवणं सोपं नाही असं मानलं जातं, पण कांगारूंच्या मते चित्र काहीतरी वेगळंच असू शकतं.
टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडला तब्बल २५४ धावांचं लक्ष्य देऊन ७ धावांनी विजय मिळवला. तर तिकडे ईडन गार्डन्सवर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने दणदणीत पराभव करत फायनल गाठली. या सेमीफायनलमध्ये किवी फलंदाज फिन ऍलनने अवघ्या ३३ चेंडूत शतक ठोकत खळबळ उडवली होती. याच ऍलनची आता भारतीय गोलंदाजांना मोठी धास्ती असणार आहे.
IND vs NZ T20 World Cup Final
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिनने ‘विलो टॉक क्रिकेट पॉडकास्ट’वर बोलताना थेट भविष्यवाणी केलीय. तो म्हणाला, “जर फायनलमध्ये फिन ऍलनची बॅट चालली, तर तो भारताच्या घरच्या मैदानावरील विजयाच्या पार्टीत एकटाच मिठाचा खडा टाकू शकतो.” हॅडिनच्या मते, न्यूझीलंडला भारतात खेळण्याची अजिबात भीती वाटत नाही. २०२४ च्या कसोटी मालिकेत त्यांनी भारताला त्यांच्याच मातीत क्लीन स्वीप दिला होता, ही धडकी भरवणारी आठवणही त्याने करून दिली.
दुसरीकडे, फक्त हॅडिनच नाही, तर दिग्गज स्पिनर नॅथन लायननेही न्यूझीलंडच वर्ल्ड कप जिंकणार असल्याचा दावा केलाय. लायनच्या मते, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरला भारतीय फलंदाज कसं खेळतात, यावरच या महाअंतिम सामन्याचा निकाल ठरेल. एकंदरीतच, फायनलच्या आधीच या दोन दिग्गजांनी न्यूझीलंडला पसंती दिल्याने क्रिकेट वर्तुळात राजकारण आणि चर्चांचं वातावरण चांगलंच तापलंय. आता भारतीय संघ या दाव्यांना कसं उत्तर देतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- Bigg Boss Marathi 6: घरात ‘भूल भुलैय्या’चा थरार; राखी सावंत बनली ‘मंजुलिका’, नव्या प्रोमोने उडवली खळबळ!
- Maharashtra Budget 2026: अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार… बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
- IND vs ENG T20 WC : धोनीच्या एका एन्ट्रीने वानखेडेवर ‘कल्ला’; गंभीरच्या मेहनतीवर ‘त्या’ आकड्याने मारली बाजी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










